डॉ. शांताराम  कारंडे

डॉ. शांताराम पांडुरंग कारंडे

समाजसेवक . संपादक . लेखक . कवी . गीतकार . नाटयनिर्माता . वास्तुविशारद . विकासक

सध्या भूषवित असलेली पदे :

१• महराष्ट्र नवनिर्माणसेना या राजकीय पक्षात रोजगार व स्वयंरोजगार विभागात महराष्ट्र राज्य सरचिटणीस.

२• धनसंचय सहकारी पतंसंस्थेमध्ये संचालक.

३• सरिता को ऑप क्रेडिट सोसायटी या पतंसंस्थेचे तज्ञ संचालक.


जन्म -
२८ मार्च १९७१ रोजी मु.पो.ता.कराड जि.सातारा येथे.
शिक्षण -
D.CE., Dip (MC & J), B.B.A, B.Sc(Ind. Sci), B. Arch, AIV, MOV,PVA, M.B.A., Ph.D (Hon) Shrilanka.
पात्रता -
• आर्किटेक्ट व बिल्डर,कवी,लेखक, पत्रकार, संपादक, वास्तुविशारद, विकासक,नाट्यनिर्माता व समाजसेवक
नोंदणीकृत मान्यता -
• वास्तुविशारद / पर्यवेक्षक / सर्वेक्षक / व्हॉल्युअर .
सभासद -
• प्रॉक्टिसींग ईजिनीअर्स, आर्किटेक्टस व टाऊन-प्लार्नर्स असोसिएशन. पिएटा.
Reg. no. K/202/2118
• मुंबई गृहनिर्माण व विकास प्राधीकरण.
Reg no. K/202/2118
• मुंबई महानगर पालिका.
Reg. no. K/361/L.5
Lic. no. K/179/55-III
L.P. Lic. no. K/2905
• 'इन्स्टीटयुशन ऑफ व्हॉल्युअर' या संघटनेचे आजिव सभासद.
नों.क. A / 24030
• 'पीव्हीए' या व्हॉल्युएशन संघटनेचे आजिव सभासद .
नों.क. L M / 3038
व्यवसाय -
१• 'आर्कव्हीशान इन्फ्राटेक लि.' या कंपनीचे डायरेक्टर.
२• 'आर्क-वि-शान क्रिएशन्स' या आर्किटेक्टरल कंपनीचे पार्टनर.
३• 'आर्क-वि-शान असोसिएटस' या आर्किटेक्टरल कंसल्टंन्सी कंपनीचे पार्टनर.
४• 'एस. के. अँडॉर्न रिअल्टर्स' या विकासक कंपनीचे पार्टनर.
५• 'आर्क-कॉन रिअल्टर्स' या बांधकाम व्यावसायीक कंपनीचे पार्टनर.
६• 'महाकाली डेव्हलपर्स' बांधकाम व्यावसायीक पार्टनर.
७• 'सिध्दांत अँसेट्स अँण्ड इन्व्हेस्टमेंट' या कंपनीचे मँनेजिंग पार्टनर.
८• 'सिध्दांत प्रकाशन' चे मँनेजिंग पार्टनर.
९• 'सिध्दरीषी डिस्ट्रीब्युटर्स' या कंपनीचे मँनेजिंग पार्टनर.
१०• 'सिध्दांत टुर्स अँण्ड ट्रव्हल्स' चे पार्टनर.
११• 'श्री. पांडुरंग प्रतिष्ठान' या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे पार्टनर.
१२• एन. एस. टी. रिअलटर्स प्रा. लि. चे संचालक.
१३• 'सिध्दांत ट्रान्सपोर्ट' चे मालक.
१४• 'सिध्दांत प्रोडक्शन' चे पार्टनर.
१५• 'सिध्दांत पिक्चर्स' चे पार्टनर.
१६• 'एस. के. इंटरप्रायझेस' चे पार्टनर.
१७• 'डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फॉऊन्डेशन प्रोडक्शन हाऊस' चे पार्टनर.
१८• 'मे. एस. के. फुड्स अॅड बेव्हरेजेस या' ब्रुकलीन ब्रँड कंपनीचे डायरेक्टर.
१९• 'मे. के. एन.पी या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे डायरेक्टर.
२०• 'मे. मॅडसन लॉजिस्टीक या सी एन्ड एक या कंपनीचे डायरेक्टर.
विशेष पदे -
१•महराष्ट्र नवनिर्माणसेना या राजकीय पक्षात रोजगार व स्वयंरोजगार विभागात महराष्ट्र राज्य सरचिटणीस.
२•धनसंचय सहकारी पतंसंस्थेमध्ये संचालक.
३•सरिता को ऑप क्रेडिट सोसायटी या पतंसंस्थेचे तज्ञ संचालक.
छंद -
• लेखन (गंभीर, हास्य, विडंबन, कथा)
• कविता लिहिणे
• कविता लिहणे / लेख लिहणे
• चित्रकला (कर्मशिअल, कलात्मक, लोगो डेजाईन)
• संगीत (संगीत पेटी वाजविणे, बुलबुल वाजविणे, नवीन चाल बसविणे)
• भ्रमण (लॉंग ड्राईव्ह ला जाने)
• समाजसेवा (गरीब व गरजूंना मदत करणे)

माझ्याबद्दल...

कोणी म्हणतो कि श्रीमंत हा अती श्रीमंत होतो आणि गरीब हा गरीबच राहतो. मेहनतीला स्वकर्तुत्वाने व ध्येयाने पछाडलेल्या कर्तुत्ववान व्यक्तीला सोबत नशीबाची साथ असेल तर तो कितीही गरिबीतून आला असेल तरी यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्या शिवाय राहत नाही. मेहनतीला कधी न कधी यश मिळतेच. खूप कमी लोक असतात ज्यांच्याकडे सरस्वती व लक्ष्मीचा वरदहस्त असतो. अशा निवडक भाग्यवान लोकांपैकीच एक म्हणजे डॉ. शांताराम पां. कारंडे.

डॉ. शांताराम पां. कारंडे यांचे मूळ गाव कराड, जि. सातारा येथील असून त्यांचा जन्म २८ मार्च १९७१ साली अत्यंत गरीब कुटुंबात झाला. कांदिवली (प.) येथील चारकोप विधानसभा क्षेत्रामध्ये राहत असलेले कारंडे हे मनसे चे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सरचिटणीस आहेत. व्यवसायाने आर्किटेक्ट व बिल्डर असलेले डॉ. कारंडे यांच्या कडे सरस्वतीचा वावर म्हणजेच त्यांची मराठी साहित्यावर असलेली जबर पकड. त्यांच्या चारोळ्या, कवितासंग्रह, कथा व वर्तमान पत्रातून नियमित स्तंभलेखन तसेच मराठी मुद्यांवर व मराठी अस्मितेवर लिहलेले बरेच स्तंभ-लेख गाजले आहेत. मनाने कवी असलेले कारंडे यांचे आपल्या कवितांवर इतके प्रेम आहे कि आतापर्यंतचे सर्व काव्य संग्रह विना मोबदला घेता प्रकाशित केले आहेत. त्यांचे आतापर्यंत ७ कवितासंग्रह व सुमारे ४५० कविता तसेच ८५० पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.

व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून हि व्यक्ती समाजकारणा सोबत राजकारणात सुद्धा अग्रेसर आहे. मा. राजसाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव आहे, म्हणूनच अवघ्या दोन तासात 'मनसे' या आद्याक्षरांवर त्यांनी चाळीस चारोळ्या लिहून 'अंगार' नावाने प्रकाशित केल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या व पदाधिकार्यांच्या सतत संपर्कात असणारे श्री. कारंडे हे समांतरपणे समाजसेवा देखील करतात. बऱ्याच सेवाभावी संस्थांना सढळ हस्ते मदत करणारे म्हणून ते ज्ञात आहेत. अनेक शाळांना शैक्षणिक मदत करण्यास ते सदैव आग्रही असतात. कित्येक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च ते स्वतः करत आहेत. विभागातीलच नव्हे तर विभागाच्या बाहेर जाऊन अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ते गरजूंना आर्थिक सहाय्य करतात. इतकेच नव्हे तर चर्मकार समाजबांधवाना दरमहा एकाला व्यवसाय करण्यासाठी रुपये २५०००/- किमतीचा कायमस्वरूपी लोखंडी स्टॉल ते मोफत वितरीत करीत असतात. असे एकूण ४२ स्टॉल्स त्यांनी मोफत वितरीत करून बेरोजगारांना रोजगाराची संधी दिली. नुकतेच त्यांनी कांदिवली पश्चिम येथील वसंतराव भागवत विद्यालयाला जवळ जवळ ८० हजार किंमतीचे बेंचेस दान केले. तसेच बऱ्याच सामाजिक कार्यक्रमाचे ते आयोजन करतात व नवयुवकांना संधी उपलब्ध करून देतात.

स्पष्टवक्तेपणा, निर्भीड विचारसरणी, धाडसी प्रवृत्ती हा स्वभावविशेष असणाऱ्या डॉ. कारंडे यांच्या आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी बरोबर घेऊन सामाजिक कार्य करत आहेत. समाजसेवेच्या या वाटचालीत डॉ. कारंडे यांच्या कुटुंबियांचा सहभागही महत्वाचा आहे. समाजासाठी उत्तरोत्तम काम करण्याची ओढही आहेच.