चारकोप - एक स्वप्न

चारकोप बद्दल सांगायचं झाल तर चारकोपला माझ्या मनी अधिक महत्व आहे एकतर मी इथे राहतो आणि ह्या चारकोपणे मला आजून मोठे होताना पहिले आहे. चारकोप मध्ये माझी झालेली जडणघडन, इथे फुललेला मी, चारकोप बद्दल आणि इथल्या लोकां बद्दल असलेली आत्मीयता त्यास्तव माझ चारकोप बद्दल असलेल स्वप्न अधिक दृड होत आहे. चारकोपच्या विकासाचा विचार करतो तर होत असलेली वाताहत पाहवत नाही. त्यामुळे इथल्या प्रश्नाचं उत्तर शोधून त्याची अंमलबजावणी करण्याचा माझा मानस आहे.

चारकोप मध्ये अनिधिकृत फेरीवाल्यांचा चाललेला वावर रोखून, त्यांच्या रखवालदाराना चाप लावून आपला परिसर हा खऱ्या अर्थाने फेरीवाला मुक्त करायला हवा किंबहुना मी ते करेन. जेव्हा मी या सर्वांचा अभ्यास केला तेव्हा असे निदर्शनास आले कि, शासनाकडे याचे धोरणच निश्चित नाही तर ते आधी निश्चित करावे लागेल कारण तसे करण्यासाठी प्रय्तन केल्यास याची अंमलबजावणी करणे शक्य आहे.

चारकोपच सौंदर्य जपणं हि काळाची गरज झालेली आहे कारण इथे होत असलेला चुकीचा विकास आणि सरकारला आलेल आंधळेपण ह्या मुळे इथल्या निसर्गाचा ऱ्हास होतोय, ह्याचा छडा लावण गरजेचं आहे कारण माझं चारकोप हे पर्यावरणा नुसार सुंदर आणि प्रदूषण मुक्त हवंय.

चारकोप हा खाडी परिसर त्यामुळे इथ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाणथळ प्रदेशातील झाडांचं (मॅनग्रूव्ह) मोठ वरदान लाभलंय. पण काही लोकांच्या वाईट दृष्टीकोना मुळे ह्या पाणथळ प्रदेशातील झाडांच्या परिसरात सतत होत असलेली डेब्रिस आणि धार्मिक कचरा(हर, फुल, वगरे.) यांची डम्पिंग हि ह्या परिसरातील पर्यावरण धोक्यात न्हेणारी आहे तरी ह्याला तातडीने रोखून ह्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुणे देणे गरजेचे आहे. आणि ह्याला माझं प्राधान्य असेल.

हे माझ स्वप्न पूर्ण करण्याची आंस मला लागली आहे, देव करो आणि हे लवकर पूर्ण होवो!

जय हिंद!

चारकोप
चारकोप
चारकोप
चारकोप

डॉ. शांताराम कारंडे यांच्या पुढाकाराने आणि मेहनतीने उभे राहिलेले अप्रतिम वेस्ट व्ह्यू गार्डन ...... फक्त इच्छा शक्तीच्या जोरावर आणि दृढ निश्चयाचा ठासून भरलेला आत्मविश्वास डॉ. कारंडे यांना यश देऊन गेला. नगरसेवकांना जमणार नाही ते डॉ. शांताराम कारंडे यांनी अवघ्या 15 दिवसात करून दाखवले. समोर आलेल्या प्रत्येक संकटाला धाडसाने सामोरे जाऊन अध्यक्षा पूजा सिंह, डॉ. आशा चौधरी, सौ. रेखा मोरे , अंकुश पोटे, सुनील गांगुर्डे, शैलेश तोरसकर व इतर सभासदांच्या सहकार्याने सेक्रेटरी डॉ. शांताराम कारंडे यांनी नंदनवन फुलवले